बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ जिल्ह्यातील तब्बल 333 ग्रामपंचायती झाल्या कोरोनामुक्त

ठाणे | गेल्या काही महिन्यांपासून कोरोना चा दुसरा लाटेने महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात थैमान घातल्याचे चित्र पाहायला मिळाले. वाढलेल्या रुग्ण संख्या मूळ आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण आला होता. अनेकांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागला. पण आता ही रुग्ण संख्या आटोक्यात आल्याचा दिलासादायक चित्र निर्माण झालं आहे.

रुग्ण संख्या जरी कमी झाली असेल तरीही कोरोना संकट अद्याप टळलेलं नाही. रुग्ण संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर डेल्टा प्लस या नव्या विषाणूने डोकं वर काढलं आहे. पण त्यातून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्याची सकारात्मक बातमी समोर आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, मुरबाड व शहापूर या तालुक्यातील तब्बल 333 ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. या तालुक्यांपैकी सर्वाधिक ग्रामपंचायती म्हणजेच 111 ग्रामपंचायती या एकट्या मुरबाड तालुक्यातील आहेत. वाढलेली रुग्ण संख्या कमी होऊन ग्रामपंचायतीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याने नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे.

कोरोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत असतानाच ठाणे जिल्ह्यातून आज ही दिलासादायक माहिती समोर आल्याने प्रशासनासह नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती कोरोनामुक्त होणारा ठाणे हा पहिलाच जिल्हा ठरला असल्याचं बोललं जात आहे.

 

थोडक्यात बातम्या

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More