जयपूर | कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेमुळं लहान मुलांना अडचणी निर्माण होणार असल्याचं वारंवार सांगण्यात येत आहे. आता राजस्थानमधील दौसा येथे कोरोनाची तिसरी लाट आल्याची चिन्हे दिसत आहेत.
दौसा येथे 341 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ही सर्व 341 मुले 0 ते 18 या वयोगटातील आहेत. 1 मे 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत या मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता दौसा जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे.
आरोग्य विभागाची टीम गावोगावी आणि घरोघरी भेट देऊन नागरिकांची कोविड टेस्ट करणार आहे. गावातच कोविड केअर सेंटर तयार करण्यात येणार आहे आणि बाधितांवर योग्य ते उपचार सुरू केले जाणार आहेत.
दरम्यान, राजस्थानमध्ये मल्टी सिस्टम इंफेलमेंट्री सिड्रोम या आजाराची 100 मुलांना बाधा होत असल्याचंही समोर आलं आहे. त्यामध्ये राजधानी जयपूरमधील सर्वाधिक 25 मुलांचा समावेश आहे. कोरोनामधून बरे झाल्यानंतर लहान मुलांना हा आजार होत असल्याचं समोर आलं आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर महिनाभर लहान मुलांच्या अंगावर विविध ठिकाणी सूज येते. लाल रंगाचे चट्टेही दिसून येतात. या आजाराची लक्षणे अमेरिकेत होणाऱ्या कावासाकी आजाराशी मिळतीजुळती आहेत. लाल डोळे होणे, ओटीपोटात वेदना, उलट्या झाल्यानं बीपी वाढण्याती शक्यता, श्वासोच्छ्वास वाढणे, हृदय धडधडणे, हृदयाची गती वाढणे, लाल मूत्र इत्याही लक्षणांचा समावेश आहे, असे या आजारावर उपचार करणाऱ्या डॉ. अशोक गुप्ता यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र आणि केरळला गुजरातपेक्षा जादा मदत करावी- सुब्रमण्यम स्वामी
“मविआ सरकारच राज्याला लागलेला कोरोना म्हटलं तर राऊतांना आवडेल का?”
“….नाहीतर गंगेत तरंगणाऱ्या पापांचे मालक म्हणून समोर या”
सकारात्मक बातमी | 101 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात
“आम्ही राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रुपात तरंगताना पाहिलाय”
Comments are closed.