मुंबई | कोरेगाव भीमा प्रकरणातील 649 पैकी 348 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. तर मराठा आंदोलनातील 548 पैकी 460 गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. या अधिवेशनादरम्यान सुरु असलेल्या चर्चेत अनिल देशमुख यांनी याबाबत माहिती दिली.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी 649 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 348 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. उर्वरित गुन्हे मागे घेण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. मात्र सार्वजनिक मालमत्तेवर आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांमधील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, नाणार आंदोलनातील 3 गुन्हे मागे घेतले असून शेतकरी आंदोलनातील गुन्हेदेखील मागे घेऊ, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
मराठीचं वाकडं करण्याची हिंमत कुणातही नाही- उद्धव ठाकरे
आपला पॅटर्नच वेगळा; सलमान खान करणार ‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक!
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्याला वाचवायला जाऊन माझ्या मुलानं जीव गमावला; आयबी अधिकाऱ्याच्या आईची प्रतिक्रिया
‘प्रवासादरम्यान जातीचा दाखला हरवला’; खासदारकी वाचवण्यासाठी जयसिद्धेश्वरांची धडपड
काश्मिरी तरुणीने गायलेल्या ‘त्या’ मराठी गाण्याचा व्हिडीओ राज ठाकरेंनी केला शेअर
Comments are closed.