बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

थट्टा नशिबानं लावली! वीज पडून 350 क्विंटल कांद्याचा झाला कोळसा

धुळे | सर्व जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याची शेती ही निसर्गावर अवलंबून असते. मात्र निसर्गाच्या जीवावर मातीतून पीक काढणाऱ्या शेतकरी राजाला निसर्गामुळेही मोठा फटका बसतो. अशाच प्रकारे धुळ्यातील एका शेतकऱ्याचं वीज कोसळल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे.

धुळ्यात बुरझड येथील शरद उत्तम पाटील या शेतकऱ्याच्या शेतात वीज कोसळून 300 क्विंटल कांदा जळून खाक झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास नियतीने काढून घेतला आहे. 6 जूनला सकाळी दहा ते अकराच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू होता आणि वाराही वाहत होता. शरद यांनी शेतात कांद्याचा साठा करुन ठेवला होता आणि त्यावेळी वीज नेमकी कांदा चाळीवरच कोसळली.

वीज कोसळल्यामुळे शरद पाटील यांचा 300 क्विंटल म्हणजेच 3500 किलो कांदा जळून खाक झाला आहे. वीज कोसळली त्यावेळी नशिबाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली. पंचायत समिती सभापती विजय पाटील, तलाठी अनिता भामरे, युवा नेते संदिप पाटील, पंचायत समिती सदस्य सुनील बोर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

दरम्यान, शरद पाटलांसोबत घडलेल्या घटनेमुळे पंचकृषीत हळहळ व्यक्त होत आहे. सरकारने आणि प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी विनंती शरद पाटील यांनी केली आहे. कारण खूप मोठं नुकसान आहे, कांदा 10 रूपये प्रतिकिलोने जरी गेला असता तरी पाटील यांनी 3 लाख 50 रूपये कांद्यातून उत्पन्न मिळालं असतं.

थोडक्यात बातम्या- 

रासायनिक कंपनीतल्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

मुंबईत दररोज हजारांच्या आत नव्या कोरोनाबाधितांची होतेय नोंद, कोरोनामुक्तीचा दर वाढला

माणुसकीला काळीमा फासणारी घटना! पैशाच्या लोभापाई सासऱ्याने सुनेला विकलं अन्…; अशा प्रकारे झाला उलगडा

अखेर बहुप्रतिक्षित आयपीएलचा मुहूर्त ठरला; ‘या’ तारखेपासून होणार उर्वरित सामने

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ शहरातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 150च्या खाली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More