महाराष्ट्र मुंबई

मुंबईत कोरोनाचे 357 नवे रुग्ण, संख्या 4 हजार 500 च्या वर

मुंबई | मुंबईत कोरोनाचे 357 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील रुग्णांची संख्या 4 हजार 589 इतकी झाली आहे. 24 तासात 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आत्तापर्यंत एकट्या मुंबईत कोरोनाची लागण झाल्याने 179 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत 595 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ज्या 11 रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी सात रुग्णांना इतर गंभीर आजाराची हिस्ट्री होती. 11 मृत रुग्णांपैकी सात पुरुष तर चार महिला होत्या. या 11 मृत्यूंपैकी एक मृत्यू 80 वर्षांच्या वरील रुग्णाचा होता.

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईत सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पॅरोलवर बाहेर आलेल्या कुख्यात डॉन अरुण गवळीची गरजूंना मदत, पाहा व्हिडीओ

‘भारतीय मनाने कणखर असून त्यांचं मनोबलच कोरोनावर मात करेल’; चीनमधील तज्ञांकडून कौतुक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या