बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लातूरमधील 36 वर्षीय तरूण उद्योजक संगमेश्वर बोमणे यांचं कोरोनाने निधन!

लातूर | लातूरमधील तरूण उद्योजक संगमेश्वर बोमणे यांचं कोरोनाने मुंबईत निधन झालं आहे. ते फक्त 36 वर्षांचे होते. बोमणे यांच्या आई वडिलांचं निधनही महिन्याभरापूर्वीच झालं आहे. संगमेश्वर बोमणे हे उद्योजक होते.

संगमेश्वर बोमणे यांच्यावर मुंबईतल्या सेव्ह हिल्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. संगमेश्वर बोमणे यांचं संगम हायटेक नर्सरीचं मोठं जाळ आहे. ऑल इंडिया नर्सरीमेन असोसिएनशनचे संचालक तसच लातुर रोटरी क्लबचे ते सचिवही होते.

लातुर परिसरात वन क्षेत्र वाढविण्यासाठी सर्वात मोठा हातभार संगमेश्वर याचा आहे. अत्यंत कमी किमतीत हवी ती रोपे हव्या त्या संख्येत रोपे लातूर सारख्या दुष्काळी भागात उपलब्ध करून दिली. गार्डन मेंटननन्स ही नवीन सुविधा उपलब्ध करून देऊन घरोघरी प्रशिक्षित माळी पाठवून जिल्ह्यात हजारोंच्या संख्येत गच्चीवरील बागा, परसबाग तयार करून दिल्या.

दरम्यान, संगमेश्वर बोमणे यांच्या निधनावर मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. संगम हायटेक नर्सरीची अगदी शून्यातून सुरूवात करून, तिला नावारूपाला आणणारे संगमेश्वर बोमणे यांचं वृक्ष चळवळीतील योगदानही मोठं आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे संगमेश्वर यांचे वडील महालिंगअप्पा आणि आई मुद्रिकाबाई या दोघांचंही निधन झालं होतं. आता संगमेश्वर यांच्या निधनाचं वृत्त आलं आहे. त्यामुळे बोमणे कुटुंबीयावर हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लातूर येथील एक होतकरू तरूण उद्योजक आणि लातूर येथील हरीत चळवळ वाढवण्याच्या योगदानामुळे त्यांच्याशी माझा वैयक्तिक पातळीवरही जिव्हाळा निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांच्या आकस्मित जाण्याने आपले वैयक्तिक आणि लातूरच्या वृक्ष चळवळीचे मोठे नुकसान झालं आहे, असं अमित देशमुख यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

‘या’ चित्रपटासाठी आमिर खानने चक्क 12 दिवस केली नव्हती अंघोळ!

कोरोनावर मात करत वसईतील 25 वर्षीय तरुणानं माऊंट एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा!

ब्रिटनच्या राजघराण्यात राजकुमारीचं आगमन, प्रिन्स हॅरी अन् मेगनला कन्यारत्न

काळ्या बुरशीचा संसर्ग रोखण्यासाठी अमरावतीत ‘हा’ नवा पॅटर्न

ब्लॅक फंगसपासून वाचायचं असेल तर ‘या’ पदार्थांचं सेवन करू नका; डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More