Top News खेळ

तिसऱ्या वनडेत भारताचं ऑस्ट्रेलियाला 303 रन्सचं आव्हान; पंड्या-जडेजाची अर्धशतकी खेळी

ऑस्ट्रेलिया | भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील आज तिसरा वनडे सामना रंगलाय. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 303 धावांचे आव्हान दिलंय.

टीम इंडियाला व्हाईट वॉश टाळायचा असेल तर ही शेवटची वनडे जिंकणं गरजेचं आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली असता पु्न्हा एकदा फलंदाजांची खराब कामगिरी पहायला मिळाली.

शिखर धवन बाद झाल्यानंतर शुभमान गिलच्या साथीने विराट कोहलीने डाव सावरला. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांच्यातील शतकी भागीदारीने टीमला 300 पार पोहोचवण्यास मदत केली. विराट, हार्दिक आणि जडेजा यांनी अर्धशतकं झळकावली.

ऑस्ट्रेलियाकडून स्पिनर अॅगर याने 2 विकेट्स घेतल्या. तर हेजलवूड, झंम्पा आणि अबॉटने 1-1 विकेट घेतलेत.

महत्वाच्या बातम्या-

“माझ्याकडे 13 एकर आहे… तुला काम नसेल तर माझ्या शेतात मजुरीला ये”

“उद्धव ठाकरेंना आव्हान देणं हे योगी आदित्यनाथ यांना जमणार नाही”

“अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’”

भाजप खासदार आणि अभिनेते सनी देओल यांना कोरोनाची लागण

“बाबरीचे ढाचे कोसळताच बगला वर केलेल्यांची हिंदुत्वाची पोपटपंची हा विनोदच”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या