बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाण्यातील खासगी रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू; जितेंद्र आव्हाडांचे चौकशीचे आदेश

ठाणे | ठाण्यातील वेदांत रुग्णालयात अतिशय धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व प्रकार उघडकीस आणला. आज सकाळी ऑक्सिजनअभावी 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असल्याचं बोललं जात आहे. याप्रकरणात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वेदांत रुग्णालयाला भेट देऊन सहा सदस्यीय समितीकडून या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं सांगितलं.

रुग्णालयातील नातेवाईकांनी या प्रकरणाची माहिती मिळताच रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली तसेच काही काळ वेदांत रुग्णालयाबाहेर तणावाचं वातावरणही पसरलं होतं. भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी सकाळी रुग्णालयाला भेट देत घटनेची माहिती घेतली. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी गोंधळ घालायला सुरूवात केल्याने या ठिकाणी पोलिसांना बोलवण्यात आलं व त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली.

ठाण्यामधील वर्तकनगर भागात वेदांत नावाचं खाजगी रुग्णालय आहेत या रुग्णालयातील चार रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचं मनसेचे पदाधिकारी संदीप पाचंगे यांनी आज सकाळी उघडकीस आणलं. मात्र, या चार रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाला नसल्याचं रुग्णालयातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर आरोप करत रुग्णालयातील ऑक्सीजन संपला होता आणि त्यानंतर प्रशासनाने महापालिका तसेच इतर ठिकाणाहून ऑक्सिजन आणला होता असं सांगितलं. त्याचबरोबर रुग्णालयाने ते चारही रूग्ण वेगवेगळ्या वेळेला आणि त्यांची परिस्थिती गंभीर असल्याने दगावले असल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्या वॉर्डमध्ये एकूण 35 रुग्ण असून त्यापैकी फक्त चारच रुग्ण हे तब्येत बिघडल्यामुळे दगावले असल्याची माहिती त्यांनी दिली.

थोडक्यात बातम्या

…म्हणून पतीने आपल्या पत्नीची प्रियकरासोबतच बांधली लगीनगाठ!

“लसींच्या दराबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री गप्प का आहेत?”

अबब! चक्क फुलपाखराचं ऑपरेशन; एकदा व्हिडीओ पाहाच  

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठेच दिसत नाहीत, मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात”

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार ; मद्रास उच्च न्यायालयाचा संताप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More