बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दैव जाणिले कुणी?” या उक्तीप्रमाणे ते चौघे मरणाच्या दारातून परतले, पाहा व्हिडिओ!

चंदीगड |  गुरुग्राममध्ये अत्यंत धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पाऊस सुरू असताना झाडाखाली थांबणं काही मजुरांना चांगलंच महागात पडलं. सिग्नेचर विला गार्डनमध्ये काम करणारे 4 मजुर पाऊस पडत असल्याने एका झाडाचा आसरा घेऊन त्याच्याखाली थांबले आणि त्यांच्यासोबत जे झालं ते पाहून तुमच्या अंगावर नक्की काटा उभा राहील.

मजूर झाडाखाली थांबले असताना त्याचवेळेला त्या झाडावर कडाक्याची वीज कोसळली. विज कोसळल्यानंतर चारही मजूर खाली कोसळल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. उभे असलेले हे मजूर वीज पडल्यानंतर काही क्षणात खाली पडले. सुदैवाने हे चारही मजूर सध्या जिवंत असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

“दैव जाणिले कुणी” ही उक्ती या घटनेला साजेशी वाटते. मरणाच्या दारात जाऊन हे मजूर कसे परतले ते सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून येतंय. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असताना पाहायला मिळत आहे. संबंधित घटनेनंतर परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले ते क्षण कोणीही पाहिले तर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. सध्या ते चारही मजूर धोक्याच्या बाहेर असल्याचं रुग्णालयातील डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाऊस पडत असताना झाडाखाली उभा राहून त्याचा आसरा घेणं किती धोक्याच ठरू शकतं हे दिसून येतं.

पाहा व्हिडिओ –

थोडक्यात बातम्या –  

आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल- शरद पवार

‘या’ कार्सवर मिळतोय 60 हजारांचा डिस्काऊंट; जाणून घ्या अधिक माहिती

‘हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केलाय’; शरद पवारांचा कोश्यारींना टोला

…अन् तसं झालं तर ठाकरे सरकार देखील पडू शकतं- कंगणा राणावत

सचिन वाझे प्रकरणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More