बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

2 दिवसांत चक्क 4 टन आंब्याची आगाऊ नोंदणी; शेतकरी डॉ. केशव सरगर यांनी लढवली ‘ही’ शक्कल

सोलापूर | राज्यात काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे लॉकडाऊनची शक्याता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी माळशिरस तालुक्यातील खुडूस गावातील शेतकरी डॉ. केशव सरगर यांनी एक शक्कल लढवली आहे. त्यांनी राज्य पणन महामंडळाच्या सहकार्यानं थेट शेतकरी ते ग्राहक विक्री व्यवस्था उभी केली आहे. सरगर यांनी शेतकरी ते ग्राहक असा पॅटर्न निर्माण केल्यानं शेतकऱ्यांसह ग्राहकांनाही फायदा होणार आहे.

शेतकरी डॉ. केशव सरगर यांनी त्यांच्या बागेतील केशर आंबा शेतकरी ते थेट ग्राहक विक्रीचा पर्याय निवडला आहे. आता त्यांच्याकडे आंब्यासाठी नोंदणी देखील झाली आहे. नव्या पर्यायी विक्री व्यवस्थेला ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. अवघ्या दोन दिवसांमध्ये स्थानिकांसह इतर भागातील अनेक शेतकऱ्यांनी 4 टन आंब्याची आगाऊ नोंदणी केली आहे.

ग्राहकांना 200 रुपये किलो या दरात आंबा मिळू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच ग्राहकांनाही याचा फायदा होत आहे. या नव्या पर्यायी विक्री व्यवस्थेमुळे आंबा उत्पादक शेतकऱ्याचा वाहतूक आणि दलालीवर होणारा खर्च कमी झाला आहे. तर ग्राहकांना सेंद्रीय पध्दतीने पिकवलेल्या आंब्याची चव अगदी कमी किंमतीत चाखता येणार आहे, असं ग्राहक अविनाश भागवत ठवरे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, खुडूस येथील शेतकरी डॉ. केशव सरगर हे अनेक वर्षांपासून केशर आंब्याचं चांगलं उत्पादन घेतात. त्यांच्याकडे 6 एकर क्षेत्रावर केशर आंब्याची बाग आहे. दरवर्षी ते 6 एकरातील 3 हजार झाडांपासून कमीतकमी 70 ते 80 टन केशर आंब्याचं उत्पादन घेतात. गेल्यावर्षी हंगामाच्या काळातच राज्यासह देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यामुळे आंबा बाहेर देशात पाठवता आला नाही. त्यामुळे यावर्षी केशर आंबा थेट उत्पादक ते ग्राहक असा विक्री पर्याय उपलब्ध केला आहे असं, डॉ. केशव सरगर यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या

राजेश टोपे यांचं महाराष्ट्रातील लाॅकडाऊन संदर्भात मोठं वक्तव्य; वाचा सविस्तर

निवडणुकीच्या प्रचारात भाजपने केली ‘ही’ घोडचूक; चूक समजताच व्हिडीओ हटवला

‘त्या’ 27 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई?; विभागीय आयुक्तांचा निर्णय, महाजनांचा जीव टांगणीला!

परिणिती चोप्राचा टाॅपलेस बोल्ड फोटो पाहून चाहते म्हणाले…

“भाजपने संपूर्ण ताकद लावली तरी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More