…म्हणून चक्क कुत्रीसोबत लावून दिलं मुलाचं लग्न!

जमशेदपूर | आरोग्य चांगलं रहावं म्हणून 4 वर्षीय मुलाचं चक्क एका कुत्रीसोबत लग्न लावण्यात आलं आहे. झारखंडच्या मोहलहिडा गावात हा अजब प्रकार घडलाय. 

4 वर्षीय अनिल सारखा आजारी पडत होता. त्यामुळे गावकऱ्यांनी कुत्रीसोबत विवाह लावण्याचा सल्ला दिला. अंधश्रद्धेतून सुचवण्यात आलेली ही सूचना मुलाच्या आईनंही स्वीकारली आणि आपल्या मुलाचा कुत्रीसोबत विवाह लावला. 

गावकरी वऱ्हाडी बनले होते तर सगळे लग्नविधी मुलाच्या आईनं पार पाडले. दरम्यान, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन या भागात असे प्रकार कायमचेच आहेत, अशी माहिती मिळतेय.