बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपने शिवसेनेला डिवचलं; शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या 40 कार्यकर्त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार

मुंबई | भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.  शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या 40 कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. नितेश राणेंनी शाल श्रीफळ आणि छत्रपती शिवरायांनी प्रतिमा देऊन भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा सत्कारही केला.

शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी भाजप युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजींदर तीवाना, दक्षिण मुंबई अध्यक्ष सनी सानप, दक्षिण मध्य मुंबई अध्यक्ष अजित सिंग, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष सचिन भिलारे, मुंबई कमिटी सदस्य रोहन देसाई यांच्यासाहित 40 कार्यकर्त्यांचा नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

राम जन्मभूमी ट्रस्टवर बिनबुडाचे आरोप करून हिंदू धर्मियांच्या भावनेशी खेळणाऱ्या आणि राम मंदिर उभारणीच्या आड येत असल्याचा आरोप करत भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला.

दरम्यान, राणे नावाने शिवसेना घाबरते. परत समोर आले तर जोरदार उत्तर द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशा शब्दात आमदार नितेश राणेंनी भाजप कार्यकर्त्यांना विश्वास दिलाय.

थोडक्यात बातम्या- 

‘आम्ही एका महान खेळाडूला गमावलं’; मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर मोदींनी व्यक्त केलं दु:ख

“शिवसेना शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालते, शिवसैनिक भगिनीवर वार करणार नाहीत”

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचं कोरोनाने निधन!

आनंदाची बातमी! राज्याचा रिकव्हरी रेट वाढला, वाचा आजची आकडेवारी

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More