Maratha Kranti Morcha 40 - मराठा आरक्षण प्रश्नी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल
- महाराष्ट्र, मुंबई

मराठा आरक्षण प्रश्नी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

मुंबई | मराठा आरक्षणाविरोधात काही व्यक्ती, संघटना, संस्था कोर्टात याचिका दाखल करु शकतात, अशी शक्यता असल्याने राज्य सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलं आहे.

मराठा आरक्षण विधेयक मंजूर करून सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिलं आहे. सरकारने तशी अधिसूचनाही काढली आहे.

कॅव्हेट दाखल केल्याने मराठा आरक्षण प्रश्नी याचिका दाखल झाल्यास सरकारची बाजू ऐकून घेतल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयास याचिकेवर निर्णय देता येणार नाही.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी  कॅव्हेट दाखल केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-वादग्रस्त व्हीडिओ प्रकरणी आयपीएस भाग्यश्री नवटकेंना पहिला झटका!

-मनोहर जोशींची निवृत्तीची मागणी; उद्धव ठाकरेंचा मात्र नकार

-हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करणार; योगी आदित्यनाथांचं आश्वासन

-नरेंद्र मोदींना टफ-फाईट; आमदार जितेंद्र आव्हाड बनले चहावाले!

-राज ठाकरेंचा हा व्हीडिओ पाहून तुमची छाती अभिमानानं फुलून येईन!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा