कीव | रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) सुरू होऊन आता जवळपास 40 दिवसांचा कालावधी उलटला आहे. रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यात युक्रेनियन सैनिकांसह हजारो सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, तरीही रशियाकडून दिवसेंदिवस हल्ले तीव्र केले जात आहेत.
रशियाने (Russia) युक्रेनची (Ukraine) राजधानी कीव येथे अनेक हल्ले केले ज्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. युक्रेनने रशियन सैन्याच्या ताब्यात असलेला कीव शहरातील भाग परत मिळवला. या परत मिळवलेल्या भागातून 410 नागरिकांचे मृतदेह परत मिळवण्यात आले आहे.
410 नागरिकांचे मृतदेह कीव शहरातील मुक्त केलेल्या भागातून बाहेर काढण्यात आले आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी आतापर्यत 140 जणांची तपासणी देखील केली असल्याची माहिती युक्रेनचे अभियोजक जनरल इरिना वेनेडिक्टोव्हा यांनी दिली आहे.
दरम्यान, रशियन सैन्यांनी कीव शहराचा पुर्णपणे ताबा घेतला होता. रशियने ताब्यात घेतलेला कीव शहराचा भाग युक्रेनने गेल्या आठवड्यात परत मिळवला. रशियन सैनिकांकडून 280 नागरिकांना सामुहिक कबरीत दफन केल्याचा आरोप देखील युक्रेनकडून करण्यात आला. तर रशियाने मात्र हे आरोप नाकारले आहेत.
थोडक्यात बातम्या-
Jio च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज, कंपनीने केली या जबरदस्त प्लॅनची घोषणा
मोठी बातमी! HDFC ने केली अत्यंत महत्त्वाची घोषणा
“…अन् तिथेच राज ठाकरेंसारख्या फायरब्रँड नेत्याचं फ्लॉवर झालं”
विराट-अनुष्काकडे आहे ‘इतकी’ संपत्ती; आकडा वाचून थक्क व्हाल
40 दिवसांपासून ना अन्न आहे ना पाणी, युक्रेनियन नागरिकांची बिकट परिस्थिती
Comments are closed.