बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी मंत्रीमंडळातील 42 टक्के मंत्र्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी; ‘इतक्या’ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल

नवी दिल्ली | गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला केंद्र सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार नुकताच पार पडला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात एकूण 43 मंत्र्यांना शपथ दिली गेली. त्यामुळे आता केंद्रात एकूण 78 जण मंत्रीपदावर आहेत. त्यातील 42 टक्के मंत्र्यांवर गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

असोसियेशन फाॅर डेमोक्राटिक रिफोम्सने म्हणजेच एडीआरने एक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात मोदी सरकारमधील मंत्रीमंडळाची माहिती दिली आहे. एडीआरच्या ताज्या अहवालानुसार, एकूण 78 केंद्रीय मंत्र्यांपैकी 33 मंत्र्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर येत आहे. या 33 मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल आहेत. शिवाय, 24 मंत्र्यांविरोधात हत्या आणि हत्येच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

निवडणूकीच्या वेळी उमेदवारांना प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं. त्यातून ही माहिती समोर आली आहे. मंत्रीमंडळात सर्वात तरूण मंत्री असलेल्या निसित प्रामाणिक यांच्याविरूद्ध देखील कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल आहे. तर जॉन बारला, पंकज चौधरी आणि वी मुरलीधरन या मंत्र्याविरोधात कमल 307 अनव्ये गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, नवीन मंत्रीमंडळात 90 टक्के म्हणजेच एकूण 70 मंत्री करोडपती आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया (379 कोटी) , पियुष गोयल (95 कोटी), नारायण राणे (87 कोटी) आणि राजीव चंद्रशेखर (64 कोटी) हे सर्वात जास्त संपत्ती असणारे मंत्री असल्याचं अहवालात स्पष्ट झालं आहे. तर प्रतिमा भौमिक या सर्वात कमी संपत्तीवाल्या मंत्री आहेत. त्यांची संपत्ती केवळ 6 लाख रूपये असल्याचं अहवालात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; ईडी कार्यालयाच्या पायऱ्या चढाव्या लागणार

“आता तिथे सुखाने रहा, पूर्वीच्या स्वभावाप्रमाणे अजून कोणाला दुखवू नका”

साहेब, राष्ट्रपती व्हावेत हीच माझी इच्छा- सीमा आठवले

संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात?; उदय सामंत यांचं सुचक वक्तव्य

“…तरच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी होईल” 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More