बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

43 वेळा कोरोना पाॅझिटिव्ह! 72 वर्षीय आजोबांनी अशी केली कोरोनावर मात

नवी दिल्ली | कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला आहे. अनेक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून भरपूर लोकांनी कोरोनानं प्राण गमावले आहे. या कोरोनाकाळात अनेक धक्कादायक घटनाही समोर आल्या. अशातच कोरोनाचा असाच गंभीर संसर्ग ब्रिटनमधील ब्रिस्टोल येथील एका 72 वर्षीय आजोबांना झाला आहे.

डेव्ह स्मिथ असे या वयोवृद्धाचे नाव असून त्यांचा कोरोना अहवाल एक-दोन नव्हे तर तब्ब्ल 10 महिन्यांपासून पॉझिटिव्ह येत असल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेतील रिजेनेरॉन या बायोटेक कंपनीने तयार केलेले सिंथेटिक अँटीबॉडीजचे कॉकटेल दिल्यानंतर ते आता कोरोनामुक्त झाले आहेत. या उपचार पद्धतीला ब्रिटनमध्ये अद्याप मान्यता नसली तरी स्मिथ यांची प्रकरणात त्याला परवानगी देण्यात आली.

वेस्ट इंग्लंडमधील ब्रिस्टल येथील सेवानिवृत्त ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर डेव्ह स्मिथ यांनी सांगितलं की, माझी 43 वेळा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यात मला सात वेळा रुग्णालयात दाखल करावं लागलं. मी माझी अंत्यसंस्काराची योजना देखील आखली होती. शेवटी हार मानून मी कुटूंबाला बोलावून सर्वांना निरोप दिला होता, अशी माहिती त्यांनी बीबीसी न्युजला दिली.

दरम्यान, डेव्ह स्मिथ हे कोरोनामुक्त झाल्यावर त्यांच्या पत्नीबरोबर शॅम्पेनची बाटली उघडून आनंद साजरा केला.

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी, वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्र अनलॉक मात्र ‘या’ जिल्ह्याची चिंता वाढली; एका दिवसात आढळले तब्बल 695 रुग्ण

घाईघाईने निर्बंध शिथिल करु नका; ‘या’ 7 जिल्ह्यांमुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आज फक्त 7 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर एकही मृत्यू नाही

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More