बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपच्या काळात खनिजकर्म महामंडळामध्ये 43 हजार कोटींचा घोटाळा”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर घोटाळ्याच मोठा आरोप केला आहे. भाजपच्या काळात खनिजकर्म महामंडळामध्ये तब्बल 43 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी केला आहे. खनिजकर्म महामंडळातील कोल वॉशरिजमध्ये 43 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत प्रशांत पवार यांनी या प्रकरणाची सीबीआय आणि ईडी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खनिजकर्म महामंडळाच्या टेंडर प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. हा घोटाळा मी डिसेंबर 2020 मध्ये मी जय जवानच्या मंचावर समोर आणलं होतं, असं प्रशांत पवार यांनी सांगितलं.

हिंद एनर्जीचा इतिहास काढला तर ईडीही आश्चर्यचकीत होईल. हे मोठे प्रकरण आहे. याच्यावर ईडी चौकशी लावली पाहिजे. हे प्रकरण समोर आणलं तर किती लोक तुरुंगात जातील हे कुणालाच कळणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

हिंद एनर्जी आणि अरिंहंत या दोन कंपन्यांना काम दिलं गेलं, त्यांनी 15 लाख टन कोळसा नेला. या क्वालिजमध्ये 43 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. भाजपच्या काळात हे कोल ब्ल़ॉक मिळाले होते, असा आरोप पवार यांनी केला.

थोडक्यात बातम्या- 

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

‘शरद पवारांनी केंद्राला कोणताही सल्ला दिलेला नाही, दिशाभूल करण्यात आली”

‘ते येतील तेव्हा भाजप विचार करेल’; राऊत-शेलारांच्या भेटीनंतर भाजपच्या बड्या नेत्याचं सूचक विधान

सोन्या-चांदीच्या दरात तेजी कायम, वाचा ताजे दर

“राफेल व्यवहाराची फ्रान्समध्ये चौकशी होऊ शकते तर भारतात का नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More