बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5649 वर

मुंबई |  राज्यात आज नव्या 431 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 649 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 683 वर पोहोचला आहे. तर पुणे शहर आणि ग्रामीण भागात एकूण 753 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

आज राज्यात 18 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईत 10, पुणे 2, औरंगाबाद 2 तर कल्याण डोंबिवली, सोलापूर, जळगाव आणि मालेगावात प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 14 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. यात 18 पैकी 12 रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले.

दरम्यान, आतापर्यंत 722 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या 722 जणांपैकी सर्वाधिक 441 पुरुष आहे, तर 281 या महिला आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

केंद्राचा मोठा निर्णय! डॉक्टरांवर हल्ला केल्यास दाखल होणार अजामीनपात्र गुन्हा

‘…तर मी आत्महत्या करेन’; नसीरूद्दीन शाह यांचं धक्कादायक वक्तव्य

महत्वाच्या बातम्या-

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 हजार पार; 24 तासात 1,486 नवे रुग्ण

“देश कोरोनाच्या संकटात असताना राजकारणाचा डमरू कुणी वाजवू नये”

‘भारतात विकासाचं चक्र पुन्हा गती घेईल’; नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More