बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

’46 रेल्वेस्थानकावर बाँम्बस्फोट’; रेल्वे सुरक्षा दलाला आलेल्या धमकीच्या पत्राने खळबळ

नवी दिल्ली | दिवाळी सणाला सुरुवात झाली असून सगळीकडे दिवाळीची लगबग दिसून येत आहे. मात्र दिवाळीच्या उत्साहात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लष्कर- ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना एक धमकीचं पत्र आलं आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र खळबळ माजली आहे.

लष्कर- ए- तोयबा कडून आलेल्या पत्रात दिवाळी दरम्यान देशातील 46 रेल्वेस्थानकांवर बाँम्बस्फोट घडवणार असल्याची धमकी दिली आहे. ज्यामध्ये लखनऊ, वाराणसी, अयोध्या, कानपूर यांसह इतर मुख्य 46 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. त्यामुळे धमकीचं पत्र मिळाल्याबरोबर लगेचच उत्तर प्रदेशमधील सर्व रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवली आहे.

धमकीचं पत्र मिळाल्यानंतर लगेच रेल्वे स्थानकांवर आरपीएफ, जीआरपी आणि श्वान पथक रवाना करण्यात आली आहेत. शिवाय रेल्वे स्थानकांवर  कोणती व्यक्ती किंवा वस्तू संशयास्पद आढळल्यास त्यासंदर्भात लगेच कसून तपासणी करण्याचे आदेश आरपीएफ आणि जीआरपी पथकाला देण्यात आले आहेत.

लष्कर-ए-तोयबा संघटनेच्या एरिया कमांडरच्या नावाने रेल्वे सुरक्षा दल आणि जीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे पत्र पाठवण्यात आले आहे. दिवाळीच्या काळात रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्यातच हे धमकीचं पत्र आल्याने सध्या रेल्वे प्रशासानसह सर्वांचीच चिंता वाढली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘त्यांनी सुरुवात केली आहे, मी शेवट करेल’; देवेंद्र फडणवीस आक्रमक

“त्यांना समीर वानखेडेंची एवढी आपुलकी का वाटतीये?”

“दाउदसोबत संबंध असलेला मंत्री मोदींच्या मंत्रिमडंळात कसा?”

अमृता फडणवीसांसोबत फोटोत दिसणारी ‘ती’ व्यक्ती ड्रग्ज पेडलर; नवाब मलिकांच्या दाव्याने खळबळ

विकत आणलेल्या पदार्थांमधील भेसळ कशी ओळखायची? वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More