रोम | कोरोना व्हायरसमुळे इटलीमध्ये एका दिवसात 475 जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. इटलीमधील मृतांचा एकूण आकडा 3 हजाराच्या आसपास पोहोचला आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव झाल्यापासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी प्राण गमावले आहेत. इटलीमध्ये कोरोना व्हायरसचे एकूण 35, 713 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांपैकी 4 हजार जणांवरील उपचार यशस्वी झाले असून ते बरे झाले आहेत.
इटलीमधील लोम्बार्डीमध्ये कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला असून इथे एकाच दिवसात 319 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, चीनपाठोपाठ इटलीमध्ये कोरोना व्हायरसचा सर्वांत जास्त प्रादूर्भाव आढळून आलेला आहे. कोरोनानं आतापर्यंत 8,758 जणांचा बळी घेतला असून चीनमध्ये मृतांची संख्या सर्वाधिक आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह तिघांवर 1 कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा
खासदार डाॅ. अमोल कोल्हेंनी सांगितला कोरोनापासून वाचण्याचा सगळ्यात साधा आणि सोपा उपाय
महत्वाच्या बातम्या-
…तरच कोरोनाची चाचणी केली जाईल- राजेश टोपे
महाराष्ट्रात ‘देऊळ बंद’ पण प्रसिद्ध हाजी अली दर्गा राहणार उघडा
लॉकडाऊन होणार, ठाकरे सरकारने अखेर केले हे पाच बदल
Comments are closed.