बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतात कोरोना व्हायरसनं घेतला चौथा बळी!

चंदिगड| कोरोनानं सगळ्या जगात थैमान घातलं आहे. अशातच कोरोनामुळं देशात चौथा बळी गेला आहे. पंजाबमधील एका 70 वर्षीय व्यक्तीचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळं संपूर्ण देशात भितीचं वातावरण आहे.

ही व्यक्ती इटलीमार्गे जर्मनीहून भारतात आली होती. छातीत दुखत असल्यामुळं या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथंच या व्यक्तीचा मृत्यु झाला. या रूग्णाचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

पंजाबच्या होशियारपूरमधील बांगा येथील रुग्णालयात या व्यक्तीचं निधन झालं. या व्यक्तीच्या गावापासूनचा तीन किमीपर्यंतचा परिसर बंद करण्यात आला आहे. या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

याआधी कोरोनामुळं तीन मृत्यु झाले आहेत. मृतांमध्ये मुंबईतील एका रूग्णाचा समावेश आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळं सरकारकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. विविध माध्यमांतून लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम सरकार करत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पंतप्रधानांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी जी काही गरज पडेल ती पुरविण्याचं वचन दिलंय- उद्धव ठाकरे

आपण जागतिक यु्द्ध लढत आहेत, घाबरून युद्ध जिकंलं जात नाही- उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

कोरोनामुळं शेतकरी अडचणीत; तोडणीला आलेली लिंब फेकून देण्याची आली वेळ

“फडणवीसांना एवढाच जर अनुभव असेल तर त्यांना वुहानला पाठवा”

ठाकरे सरकारचा भाजपला झटका; भाजपनं केलेल्या ‘या’ नियुक्त्या केल्या रद्द

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More