गोवा | सध्या आयपीएलचा थरार सुरु आहे. यामध्येच गोव्यामध्ये आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या टोळीच्या कलंगूट पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत.
गोव्यातील बागा इथल्या ताओ पॅलेस हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी पाच सट्टेबाजांना अटक केली आहे. या 5 जणांकडून 15 मोबाईलचा संच, 3 लॅपटॉप तसंच जवळपास अडीच लाखांपर्यंतचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताओ पॅलेस हॉटेलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगळूरू सामन्यावर सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने या ठिकाणी धाड टाकून 5 जणांना अटक केलीये.
महत्वाच्या बातम्या-
“…तुमचे बाप कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे”
“मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काहींना प्रसिद्धीच मिळत नाही”
गुड न्यूज! मुंबईत 84 टक्के रूग्ण कोरोनामुक्त
“बेकायदेशीर काम कायद्याने थांबवा, सुरुवात भाजपपासून करा”