बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपला धक्का! ‘इतक्या’ नगरसेवकांनी भाजपची साथ सोडत बांधलं शिवबंधन

जळगाव | काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगर येथील 6 विद्यमान भाजप नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता शिवसेनेने जळगावात भाजपला आणखी मोठा धक्का दिला आहे.

जळगाव महानगरपालिकेतील पाच भाजप नगरसेवकांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधल्यानं भाजपला दोन महिन्यात सलग दुसरा मोठा धक्का बसला आहे. तर आणखी पाच भाजप नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

जळगाव महापालिकेवर गेल्या अडीच वर्ष भाजपची एक हाती सत्ता होती. भाजप नेते गिरीश महाजनांचा हा बालेकिल्ला समजला जातो होता. त्यानंतर नुकताच जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का बसला होता. जळगावच्या या महापालिका निवडणुकीत सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती झालेली दिसली होती. भाजपचे एक दोन नव्हे तर 27 नगरसेवक फुटल्याने भाजपला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर शिवसेनेने जळगाव महापालिकेवर भगवा फडकवला.

दरम्यान, महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौरपदी विराजमान झाल्यानंतर भाजपचे नगरसेवक चिंतेत असल्याचं सांगितलं जात होतं. पण आता 5 नगरसेवक फुटल्यानं भाजपला हा देखील एक मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

2 कोटी रुपये जिंकण्याची संधी, ‘या’ सरकारी कंपनीची जबरदस्त ॲाफर

कोरोना व्हायरस कुठून आला?, शास्त्रज्ञांना सापडला मोठा पुरावा

क्लार्कच्या घरावर पडला छापा, संपत्ती पाहून अधिकाऱ्यांचे डोळे झाले पांढरे!

कोरोनामुळे आपल्या पालकांना गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षणासह केंद्र सरकारच्या मोठ्या घोषणा!

आनंदाची बातमी! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More