बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…नाहीतर मेडिकल दुकानदार संपावर जाणार’, राज्य सरकारला दिला 5 दिवसांचा अल्टीमेटम!

पुणे | कोरोना काळात डॉक्टर, पोलिस, पत्रकार या प्रमाणे मेडिकलवाल्यांनी देखील आहोरात्र योद्ध्याप्रमाणे लोकांना सेवा दिली आहे. यामुळे सर्व मेडीकल दूकानदारांचं लसीकरण तातडीनं करा, अशी मागणी पुणे जिल्हा मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील शहा यांनी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री अजित पवारांकडे केली आहे.

मेडिकल दुकानदारांनी सरकारला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. पाच दिवसात लसीकरणाचा निर्णय घेतला नाही तर मेडीकल दूकानदार जाणार संपावर, अशी माहिती पुणे जिल्हा मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील शहा यांनी दिली आहे. मेडिकल असोसिएशननं सरकारला पाच दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.

पुणे जिल्ह्यातील हजारो केमिस्ट दिवस रात्र रूग्णांची सेवा करण्यासाठी काम करत आहेत. या दम्यान आमच्या अनेक केमिस्ट बांधवांना कोरोनाची लागण देखील झाली आहे. तसेच अनेकांचा कोरोनाने मृत्यू देखील झाला आहे, असं सुनील शहा यांनी सांगितलं.

दरम्यान, सरकारने सर्व मेडिकलमधील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही बेमूदत संपावर जाऊ, असा इशारा सुनील शहा यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘द बेस्ट ऑस्कर एव्हर’ म्हणत राम गोपाल वर्मांनी उडवली नरेंद्र मोदींची खिल्ली

सोनूने कहर केला, 13 मुलांना नादी लावून लग्न केलं अन्…

पिंपरीतील कुटुंबावर दुःखाचा डोंगर; दोन दिवसात दोन सख्ख्या भावांचा कोरोनानं मृत्यू

‘माझी आईच जेवण बनवते पण 2 दिवस झाले ती झोपलीये,…’; आईच्या मृतदेहाजवळ बसून राहिली मुलगी

सावध व्हा, या शहरात 341 चिमुरड्यांना कोरोनाची बाधा, काळजी घ्याच…!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More