कार झाडाला धडकून पालघरमध्ये 5 जण ठार

पालघर | कार झाडाला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय. पालघरजवळच्या पाटीलवाडी येथे हा धक्कादायक अपघात झाला. 

सकाळच्या सुमारास ही गाडी जण पालघर अोलांडून पुढे जात होती. त्यावेळेस ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटल्याने हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, अपघातात मृत झालेले व्यक्ती कोण आहेत? ते कुठे निघाले होते? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याविषयीचा तपास करत आहेत.