बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

IPLच्या इतिहासातील 5 जबरदस्त खेळी, ज्या कुणीच विसरु शकत नाही!

मुंबई | इंडियन प्रिमियर लीग आल्यानंतर क्रिकेटमध्ये खूप काही बदला झाले आहेत. कोणत्याही खेळाडूला आपल्या संघात जागा मिळवायची असेल तर तो आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन आपल्या संघात जागा मिळवू शकतो. हे फक्त भारतीय खेळाडू नाही तर बाकी देशाचे खेळाडू देखील, असं करु शकतात. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक चाहत्याला वाटतं की, प्रत्येक खेळाडूची खेळी चांगली झाली पाहीजे.

आयपीएल स्पर्धा क्रिकेटच्या इतिहासातील क्रांतीपेक्षा कमी नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कौशल्य दाखविण्याची संधी न मिळालेल्या तरुणांसाठी ही स्पर्धा एक वरदान आहे. आयपीएलमध्ये रेकॉर्ड करा आणि एक एक करून तो रेकाॅर्ड तोडा. पण आयपीएलच्या सामन्यात मोठी खेळी करणारे देखील खूप खेळाडू आहेत.

मनविंदर बिस्ला –

2012 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अंतिम सामना झाला होता. त्यावेळी केकेआरकडून खेळताना बिस्लाने 48 चेंडूत 89 धावा केल्या. या दरम्यान त्याने 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्जने जिंकला होता.

मुरली विजय –

2011 च्या आयपीएल फायनलमध्ये मुरली विजयने बेंगळुरूविरुद्ध 52 चेंडूत 35 धावा केल्या होत्या. आणि तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. या दरम्यान त्याने 6 षटकार आणि 4 चौकार ठोकले होते. त्याच्या सर्वोत्तम खेळीसाठी मुरली विजयला ‘सामनावीर’ पुरस्कार मिळाला होता.

मनीष पांडे – 

2014 मध्ये केकेआरने मनीष पांडेमुळे दुसर्‍या वेळी आयपीएलचे विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने 199 धावांचा डोंगर उभा केला होता. केकेआर संघाने लक्ष्य गाठण्यासाठी सुरुवातीला अडचणी आल्या पण मनिष पांडे येताच संघाला मजबूत स्थितीत आणले आणि 50 चेंडूत 94 धावा केल्या. या खेळीसाठी त्याला ‘सामनावीर’ पुरस्कार मिळाला होता.

ऋद्धिमान साहा –

आयपीएल 2014 च्या अंतिम सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना ऋद्धिमान साहाने फलंदाजी करताना 55 चेंडूंत नाबाद 115 धावा केल्या होत्या. साहाच्या फलंदाजीमुळे संघाला 199 धावांची मजल मारता आली. अंतिम सामन्यासह संघाने आयपीएल 2014 चे विजेतेपदही गमावले.

शेन वाॅटसन – 

आयपीएल 2018 च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून चेन्नई सुपर किंग्जने तिसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद मिळविण्यास यश मिळविले. मात्र, शेन वॉटसन अंतिम सामन्यात नायक ठरला. त्याने 57 चेंडूत नाबाद 117 धावा केल्या. या दरम्यान त्याने 8 षटकार आणि 11 चौकार लगावले होते.

दरम्यान, आयपीएल मध्ये सर्वात जास्त रन करणारा खेळाडू म्हणजे विराट कोहली आहे, तर सर्वात जास्त चौके गब्बर शिखर धवनने मारले आहेत. सर्वात जास्त षटकार मारण्याचा विक्रम क्रिस गेलच्या नावावर आहे. मूळात असे खुप खेळाडू आहेत ज्यांनी त्यांच्या आयपीएल करिअर मध्ये एकही चौका मारला नाहीये.

थोडक्यात बातम्या –

काय सांगता! IPLमध्ये ‘या’ 3 भारतीयांनी अजून एकही चौका मारला नाही!

फखर जमान रनआऊट प्रकरण, ‘या’ कारणामुळे क्विंटन डी कॅाकला क्लीनचीट!

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास आता पुण्यातील ‘या’ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार नाहीत!

“येत्या 40 दिवसात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद सोडावं लागेल”

करिनाच्या धाकट्या लेकाचा फोटो चुकून झाला व्हायरल; असा दिसतो तैमुरचा लहान भाऊ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More