देश

अयोध्या प्रकरणाच्या अंतिम निकालातील हे आहेत 5 महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली | अयोध्या प्रकरणी ऐतिहासिक निकाल ,सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या जागेचा वाद त्यामुळे आता संपुष्टात आल्यात जमा आहे. निकाल देताना न्यायालयानं काय सांगितलं यातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे-

न्यायालयाच्या निकालातील ७ प्रमुख मुद्दे-

१. न्यायालयाच्या निर्णयानूसार, वादग्रस्त २.७७ एकर जागा राम मंदिरासाठी मिळणार आहे.

२. मुस्लिमांना न्यायालयाने नाराज केलं नाही, मशिदीच्या निर्मितीसाठी अयोध्येत मोक्याच्या ठिकाणी ५ एकर जागा देण्याचे न्यायालयाचे आदेश

३. निर्मोही आखाड्याचा दावा न्यायालयाने फेटाळला, आस्थेच्या आधारावर जागेचा हक्क मिळणार नाही, असं न्यायालयाने सांगितलं.

४. अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी ३ महिन्यात ट्रस्ट बनवण्याचे सरकारला आदेश, निर्मोही आखाड्याला ट्रस्टमध्ये स्थान द्यायचं की नाही याचा निर्णय सरकार घेईल

५. बाबरी मशिदीखाली असलेली संरचना इस्लामिक पद्धतीची नव्हती. पुरातत्वशास्त्राला नाकारलं जाऊ शकत नाही- सर्वोच्च न्यायालय

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या