बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

5 महिने एकत्र राहून ठेवले शरीरसंबंध, त्यानंतर… अत्यंत धक्कादायक प्रकार समोर

यवतमाळ | महाराष्ट्रातील यवतमाळ येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या शहरातील अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर या दोघांनी जे केलं ते तर हैराण करण्यासारखं आहेच, मात्र यादरम्यान दोघांनी तब्बल 5 महिने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर जी धक्कादायक बाब समोर आली त्याने तरुणीच्या पायाखालची जमीनच सरकली.

या घटनेतील तरुणाचं नाव संतोष दत्तू चौगुले असं आहे. संबंधित तरुण हा 26 वर्षांचा असून तो मारेगाव येथील रहिवासी आहे. संतोषने आपल्याच शहरातील एका अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर त्यांच्या प्रेमसंबंधातून दोघांनी पळ काढला. डिसेंबर महिन्यात दोघेही शहर सोडून पळून गेल्यानंतर मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली होती. मात्र शोध घेऊन देखील दोघांचा पत्ता लागला नाही.

संबंधित तरुण आणि मुलगी हे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे मोलमजुरी करुन एकत्र राहत होते. पाच महिने या ठिकाणी राहत असताना दोघांनी शारीरिक संबंध देखील ठेवले. मात्र दोघांमध्ये नंतर वाद होऊ लागले. यादरम्यान, मुलगी आपल्या आईकडे परत आली आणि संतोषवर फसवणुकीचा आरोप लावून त्याच्या विरोधात तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली.

दरम्यान, मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता ती गरोदर असल्याचं समोर आलं आहे. मात्र आरोपी हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संबंधित आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

अरबी समुद्रातील वादळाचं रौद्ररुप, पुण्यावर काय परिणाम होणार?

काँग्रेस नेते व खासदार राजीव सातव काळाच्या पडद्याआड; कोरोनाशी झुंज अपयशी

अदर यांच्यानंतर आता वडील सायरस पुनावालाही लंडनला रवाना, नव्या चर्चांना उधाण

नियम न पाळणाऱ्यांवर सर्वात मोठी कारवाई, ॲम्बुलन्समध्ये बसवून कोरोना…पाहा व्हिडीओ

पुण्यात मध्यरात्री काळजाचा थरकाप उडवणारा थरार, 10 जणांच्या टोळक्याकडून सपासप वार!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More