महाराष्ट्र मुंबई

आजपासून आणखी 5 ठिकाणी कोरोना निदान प्रयोगशाळा

Loading...

मुंबई |  देशात महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक आहे. आतापर्यंत 8 हजारपेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झालेलं स्पष्ट झालं आहे. अशा परिस्थितीत अचूक निदान करून घेण्यासाठी विषाणू निदान प्रयोगशाळेच्या पायाभूत सुविधा देखील प्राधान्यक्रमाने वाढविल्या जात आहेत.

राज्यातल्या आणखी 5 ठिकाणी विषाणू निदान प्रयोगशाळांना नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने ग्रीन सीग्रन दर्शवला आहे. यानुसार विदर्भातील सेवाग्राम, मराठवाड्यातील लातूर, नांदेड, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक या शहरांचा समावेश आहे.

आयसीएमआर आणि एम्सच्या निकषानुसार महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये करोना निदान विषाणू प्रयोगशाळेची पायाभूत सुविधा आजपासून सेवेत रुजू होणार आहे. त्यामुळे या 5 शहरांमध्ये कोरोना निदानाची सोय उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, कोरोना निदानाच्या प्रयोगशाळा वाढवल्याने आता ठराविक प्रयोगशाळांवप ताण येणार नाही. तसंच कोरोनाविरोधी लढ्याच्या कामाला आता अधिक वेग येईल.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

पोलिसांनी वारंवार सांगूनही ऐकलं नाही; ‘या’ कारणामुळे पुणे पोलिसांनी पकडले ६९९ जण

“लॉकडाऊन संपण्याची चिन्हं नाहीत, हे प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार”

महत्वाच्या बातम्या-

राज्य सरकारचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

“लॉकडाऊन वाढवायचा की नाही याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आजच निर्णय घेतील”

कोरोना विरोधातील लस शोधण्याच्या प्रक्रियेला गती- WHO

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या