बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिंदे गटातील आणखी 5 आमदारांना मोठा झटका बसण्याची शक्यता!

मुंबई | एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला मोठं खिंडार पाडत शिवसेनेच्या आमदारांनी बंड केलं. यानंतर हा बंडखोर आमदारांचा गट सुरतला गेला आणि नंतर तेथून आसामच्या गुवाहाटी येथे एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये उतरले. त्यानंतर सुरु असलेले नाराजीनाट्य आता एका निश्चित वळणावर येऊन पोहोचले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काॅँग्रेस नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचे सर्व प्रयत्न करुन ते फसले. शिंदे गट कोणताच प्रतिसाद देत नाहीत असे पाहून शेवटी पक्षाने अधिकृत कारवाईचे शस्त्र उगारले आहे. सरकारमध्ये असून सरकारचे आदेश न पाळल्याप्रकरणी त्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे. याप्रकरणी १२ आमदारांवर कारवाई होणार असून आणखी ५ आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांची नावे आता पुढे आली आहेत.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे ही कारवाई करणार आहेत. विधीमंडळ कायद्यांतर्गत ही कारवाई होणार असल्याचे कळते. सुनिल प्रभु यांनी काढलेल्या व्हीपनंतर बैठकीला उपस्थित नसल्याने या १२ आमदारांवर कारवाई करण्याची विनंती सुनिल प्रभू यांनी केली. मात्र हा आकडा आणखी ५ ने वाढला आहे. आणखी ५ जनांची अपात्रतेसाठी नावे देण्यात आली आहेत.

१) सदा सरवणकर २) प्रकाश आबिटकर ३) संजय रायमुळर ४) बालाजी किणीकर ५) रमेश बोरनारे अशी अपात्र आमदार ठरवण्यात येणाऱ्यांची नावे आहेत.

थो़डक्यात बातम्या – 

राज्यातील घडामोडींवर चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…

‘तोपर्यंत मला मुख्यमंत्री करा’; शेतकऱ्याचं राज्यपालांना पत्र

‘त्यांचा माज वाढलाय’; नारायण राणेंनी शरद पवारांना दिलेल्या इशाऱ्यावर संजय राऊत संतापले

“महाविकास आघाडी सरकार पडतंय त्याचं मला दुःख नाही फक्त…”

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या वक्तव्याने शिंदे गटाला मोठा धक्का!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More