Skin Care | डागविरहीत त्वचा कोणाला नाही आवडत. प्रत्येकाला सुंदर त्वचा हवी असते. पण कामाच्या गडबडीमध्ये आपण त्वचेकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र प्रयत्न करूनही म्हणावी तशी त्वचा मिळत नाही. मात्र काही नैसर्गिक उपाय करून तुम्ही सुंदर दिसू शकता.
कोणत्याही साइड इफेक्टशिवाय सुंदर त्वचा (Skin Care) हवी असेल तर खालील 5 टिप्स नक्की फॉलो करा. या टिप्स फॉलो केल्यास तुमची त्वचा सुंदर (Skin Care) होण्यास मदत होईल.
सुंदर त्वचेसाठी 5 नैसर्गिक उपाय
लिंबूच्या रसात व्हिटॅमिन C असते, जे त्वचा उजळवण्यासाठी उपयुक्त आहे. एक चमचा लिंबूचा रस आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. 10-15 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. यानंतर त्वचा उजळते. तसेच बेसन आणि दूध यांची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करते. आठवड्यातून 2-3 वेळा हा उपाय करा.
कोरफडीच्या जेलमध्ये नैसर्गिकरित्या त्वचा उजळवण्याची क्षमता असते. रोज रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचे जेल चेहऱ्यावर लावा आणि सकाळी धुवा.
काकडीच्या तुकड्यांनीही चेहरा चोळल्याने त्वचा ताजीतवानी आणि उजळ होते. काकडीचा रस चेहऱ्यावर लावला तर तो त्वचेला आर्द्रता देतो.
हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटीफंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेची ऍलर्जी, फोड आणि मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करतात. हळदीचा वापर संवेदनशील त्वचेसाठी देखील प्रभावी आहे. हळदीची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावर ग्लो येतो, तसेच त्वचा निरोगी राहते.
Skin Care | ‘या’ गोष्टींची काळजी घ्या
तुमच्या आहारात फळे, भाज्या, आणि अँटिऑक्सिडंट्सचे सेवन वाढवा. भरपूर पाणी प्या, यामुळे त्वचा ताजीतवानी आणि स्वच्छ राहते. याशिवाय, नियमितपणे सनस्क्रीन वापरणे आणि धूळ, प्रदूषण यापासून त्वचेचं संरक्षण करणं अत्यावश्यक आहे. हे उपाय नियमितपणे केल्यास, हळूहळू त्वचेचा रंग सुधारला जाऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने केली मोठी घोषणा
उर्वरित बहिणींना कधी मिळणार लाभ?, अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
लाडकी बहीण योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय!
मोठी दुर्घटना! पुण्यात ‘या’ ठिकाणी हेलिकॉप्टर क्रॅश
सरकारने 150 पेक्षा अधिक औषधांवर घातली बंदी; पाहा औषधांची यादी