धुळे | मुलं चोरणारी टोळी समजून सोलापुरातील 5 जणांची ठेचून हत्या करण्यात आलीय. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
मुलं चोरणारी टोळी सक्रीय झाल्याच्या अफवा पसरल्या आहेत. याच अफवांमुळे गाडीसह या पाच जणांना गावकऱ्यांनी पकडलं. ग्रामपंचायतीच्या खोलीत डांबून पाचही जणांची ठेचून हत्या करण्यात आली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांवरच दगडफेक झाल्याची माहिती आहे. दरम्यान, आता सारं गाव फरार झालं असून पोलिसांनी 11 जणांना ताब्यात घेतलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-…तर संभाजी भिडेंना 25 लाख रूपये देणार; अंनिसची घोषणा!
-यापुढे निवडणूक होणार नाही; सर्वसहमतीने संमेलनाध्यक्ष निवडणार!
-चंद्रकांत पाटील कोणत्याही थराला जावू शकतात-सतेज पाटील
-माझ्या अडचणीत नेहमीच विनायक मेटे धावून येतात- मुख्यमंत्री
-पुढच्या वेळेस येईल तेव्हा सगळं व्यवस्थित हवं; मुंढेंचा अधिकाऱ्यांना दम