लोकसभा निवडणुकीत ‘काय’ होईल; मोदींनी गुप्तचर विभागाला लावले कामाला??

लोकसभा निवडणुकीत ‘काय’ होईल; मोदींनी गुप्तचर विभागाला लावले कामाला??

नवी दिल्ली |लोकसभा निवडणुकीत जनतेचा ‘मूड’ कसा असेल? हे जाणून घेण्यासाठी मोदींनी गुप्तचर विभागाला कामाला जुंपले आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले आहे. या तीन राज्याचा पराभवाचा धसका भाजपने चांगलाच घेतला आहे.

पंतप्रधान मोदींनी भाजपचा पराभव झाल्यानंतर तातडीने ‘इन्टिलिजन्स ब्युरो’ची एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत मतदारांचा ‘मूड’ काय असेल हे जाणून घेण्याचे आदेश ‘आयबी’च्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान, भाजप आणि मोदी सरकारने आपले संपूर्ण लक्ष आता लोकसभा निवडणुकीवर केंद्रित केले आहे असं म्हणावं लागेल.

महत्वाच्या बातम्या –

-दिलीप वळसे पाटिलांनी राष्ट्रीय राजकारणात जावं – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

-“रामाचं मंदिर रामाच्या जन्मस्थानी नाही होणार, मग कुढल्या स्थानी होणार?”

-नितेश राणे-रामदास कदम वाद चिघळला; नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट

-अमित शहांना दुर्बिण भेट देणार – कपिल सिब्बल

-“… तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आज भाजपमध्ये असते”

Google+ Linkedin