नवी दिल्ली | अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असून, 2024 पर्यंत आम्ही 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करणार असल्याचा मोठा दावा पंतप्रधान मोदी यांनी इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
कोरोनाच्या महामारीमध्ये भारताने आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी जे सुधारणावादी पाऊल उचललं आहे, त्यामुळं संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे लागलं आहे. जगभरातील देश भारताच्या बाजारातील ताकदीवर विश्वास व्यक्त करत आहेत, असं मोदींनी यावेळी सांगितलं.
कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत आहे, म्हणजे आपण आनंदोत्सव साजरा करण्याची ही वेळ नाही. तर आपले आचरण आणि आपली व्यवस्था अजून मजबूत करण्याची ही वेळ आहे, असं मोदी म्हणालेत.
भारतात नुकतेच कामगार कायदा, कृषी कायदा आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात जे बदल केले आहेत, त्यामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे बदल पाहयला मिळतील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली- राज ठाकरे
कोरोना लसीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
‘मतदान बोटाने नाही तर…’; सोनू सूदचा बिहारच्या लोकांना मोलाचा सल्ला
‘…म्हणून पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केली’; पाकिस्तानी मंत्र्याच्या खुलासा