जळगाव महाराष्ट्र

जळगावातील खळबळजनक घटना; पैशाचं आमिष दाखवून 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

जळगाव | पैशाचं आमिष दाखवून 5 वर्षीय चिमुरडीवर 37 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव या ठिकाणी ही घटना घडली आहे.

याप्रकरणी पीडिताच्या मातेने तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वीही आरोपीने असा गुन्हा केला होता. त्यामुळे या गुन्ह्यातही त्याला शिक्षा झाली आहे. याप्रकरणी जेलमधून सुटल्यावर नराधम संदीप तिरमलीने पुन्हा 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केला.

या चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर संदीप तिरमली हा नराधम हावडा एक्सप्रेसमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्यावेळी हावडा एक्सप्रेसमधून पोलीस उपनिरीक्षक शिंदे आणि पथकाने सापळा लावून त्याच्या मुसक्या आवळल्या.

सलग 2 वेळा असा गुन्हा केल्यानंतर नराधम मुळात तो तुरंगातून सुटतोच कसा, असा सवाल महिला आयोगाच्या माजी सदस्या देवयानी ठाकरे यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाच्या नव्या प्रकाराने इंग्लंडमध्ये थैमान; बोरिस जॉन्सन यांच्याकडून पुन्हा लॉकडाऊनची घोषणा

सोहेल खान, त्यांचा मुलगा निर्वाण खान आणि अरबाज खानविरोधात FIR दाखल!

‘महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकाराल का?’; नाना म्हणाले…

औरंगाबाद नाही तर ‘या’ जिल्ह्याला संभाजी महाराजांचं नाव द्या- प्रकाश आंबेडकर

“शिवसेनेमुळेच काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले हे लक्षात ठेवा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या