सातारा | साताऱ्यातील खोजेवाडी येथे पाच वर्षाच्या मल्हार शिंदे या चिमुकल्याचा वाढदिवस होता. मग काय मल्हार सेठचा वाढदिवस असल्यामुळे वडिलांनी लेकाचा वाढदिवस जरा हटके करण्याचं ठरवलं. मग काय गौतमी पाटील(Gautami Patil) हिला बोलावण्यात आल.
कार्यक्रमाला पंचक्रोशीतील गौतमी पाटीलचे (Gautami Patil) चाहते उपस्थित राहिले होते. गौतमी पाटीलनेही मल्हारसोबत केक कापला आणि त्याला शुभेच्छा दिल्या.
गौतमी पाटील (Gautami Patil) च्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आपल्या दिलखेच अदांनी आणि सौंदर्याने तरुणाईला भूरळ घालणारी गौतमी दिवसेंदिवस अधिक फेमस होत चालली आहे.
दरम्यान, राजकीय कार्यक्रम असो, वाढदिवसाचा कार्यक्रम असो किंवा कुठल्या नेत्याचा कार्यक्रम असेल तर गौतमी पाटील पाहिजे म्हणजे पाहिजेच, असं आता झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-