महाराष्ट्र मुंबई विधानसभा निवडणूक 2019

काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत 50 उमेदवार; ‘या’ दिग्गज नेत्यांचा समावेश?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची पहिली उमेदवार यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची चिन्हे आहेत. आज 40 ते 50 जणांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे.

पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,  प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, रमेश बागवे, प्रणिती शिंदे यांची नावं जवळपास निश्चित मानली जात आहे. नांदेड जिल्ह्य़ातील भोकर विधानसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण यांच्या पत्नी आमदार अमिता चव्हाण यांच्याऐवजी पक्षाने अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिल्याचं कळतंय.

पहिल्या यादीत काँग्रेसच्या काही विद्यमान आमदारांसह काही माजी आमदारांचीही नावे आहेत. कोल्हापूर दक्षिणमधून सतेज पाटील यांच्याऐवजी ऋतुराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान,  हिंगोली जिल्ह्य़ातील कळमनुरी मतदारसंघातून राजीव सातव यांच्या जागी डॉ. संतोष तारफे यांना उमेदवारी देण्यात आल्याचं समजतंय.

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या