बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘50% लहान मुलांच्या शरिरात कोरोना अँटीबाॅडी’; लसीच्या चाचणीपुर्वी धक्कादायक खुलासा

मुंबई | कोरोनाची दुसरी लाट आता आटोक्यात येत आहे. या लाटेत अनेक तरूणांना ग्रासलं होतं. आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता लहान मुलांच्या लसीकरणाचा मुद्दा सध्या सरकारी कक्षेत चर्चेत आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी आता लसीकरण चाचणीस सुरवात करण्यात आली आहे. त्यात एक मोठा खुलासा झाला आहे.

कोव्हॅक्सिन लसीची 2 ते 18 वयोगटामधील लहान मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. आता या वयोगटातील मुलांवरील कोव्हॅक्सिनची चाचणी सुरू होणार असल्याचं डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता या चाचणीस सुरवात करण्यात आली आहे. या चाचणीसाठी 10 शहरातील मुलांना निवडण्यात आलं होतं. लशीच्या चाचणीसाठी ज्या लोकांना निवडण्यात येतं, त्यांची सुरुवातीला आरोग्य चाचणी केली जाते.

निवडण्यात आलेल्या लहान मुलांची जेव्हा चाचणी करण्यात आली तेव्हा 50% लहान मुलांना कोरोना होऊन गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यांच्या शरिरात अँटीबाॅडी देखील आढळल्या आहेत. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत, की नाही याबद्दलची तपासणी केली जाते. शिवाय त्यांची कोरोना चाचणीही केली जाते. एम्समध्ये ज्या लहान मुलांवर लशीच्या ट्रायलआधी अशी चाचणी घेण्यात आली. त्यापैकी बहुतेक मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.

दरम्यान, वैज्ञानिकांनी लहान मुलांची कोरोना चाचणी करण्यासाठी एक अनोखं टेस्टींग किट विकसित केली असल्याचं समोर येत आहे. लहान मुलांच्या नाकातून आणि घशातून स्वॅब घेण्यासाठी अडचण येते, अशा मुलांसाठी नवीन टेस्टींग किट तयार करण्यात आली आहे. लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या या किटला ‘लॉलीपॉप टेस्टींग किट’ असं नाव देण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून वयाच्या अटीमध्ये बसत नसून देखील फडणवीसांच्या पुतण्याला लस दिली गेली!

राज्यातील ‘या’ जिल्ह्याला रेड अलर्ट जारी; पुढील 24 तास पाऊस झोडपून काढणार

मुंबईतील मालाड भागात चार मजली इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना, 9 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर

‘या’ प्रसिद्ध क्रिकेटरची सेक्स टेप लीक, हॉटेलमध्ये बनवलेल्या या अभिनेत्रीसोबतचा व्हिडीओ लीक

जॉगिंग किंवा मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडताना मास्क वापरणं योग्य की अयोग्य?, जाणून घ्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More