पुणे | पिंपरी चिंचवडच्या महापौर निवडणुकीत भाजपचे राहुल जाधव यांचा विजय झाला. या विजयाच्या जल्लोषात भाजपने तब्बल 50 ते 60 पोती भंडारा उधळला.
राहुल जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मात केल्यावर जाधव यांचे हजारो कार्यकर्त्यांनी महापालिका आवारात गर्दी केली होती. त्यानंतर जेसीबी, चार चाकी वाहनांवर उभे राहुन या कार्यकर्त्यांनी भंडारा उधळला.
दरम्यान, भाजपच्या या जल्लोषामुळे रस्त्यावर भंडाऱ्यांचा खच साचला होता. त्यात पडणाऱ्या पावसामुळे चिखल झाला त्यामुळे नागरिकांना चालताना त्रास सहन करावा लागला. अनेकांची वाहने घसरून पडली. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दोन तास मेहनत केल्यानंतर हा भंडारा हटवला.
महत्त्वाच्या बातम्या–
-राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर; ‘या’ तारखेपासून मिळणार सातवा वेतन आयोग
-मराठा समाजाला आरक्षण मिळाले तरी नोकऱ्याच उपलब्ध नाहीत- नितीन गडकरी
-नितेश राणेंना आॅडिओ क्लिप भोवणार; पोलिसांकडे तक्रार दाखल
-मुठभर मराठा घराण्यांमुळेच मराठा समाज अडचणीत आला- सदाभाऊ खोत
-होय… मी कबुल करतो, भाजपबरोबर जाणं ही माझी चूक होती- राजू शेट्टी