बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सरकार एकटं नाही लढू शकणार’; कोरोनाचा सामना करण्यासाठी ‘नाम’चा मदतीचा हात

मुंबई | नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनने कोरोनाशी लढण्यासाठी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून पंतप्रधान सहायता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांच्यासाठी प्रत्येकी 50 लाख रुपये पाठवणार आहोत, असं नाना पाटेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

नमस्कार मी नाना पाटेकर, या क्षणाला आपण सगळ्यांनी जात, धर्म, पंथ विसरुन सरकारला सहकार्य करणं गरजेचं आहे. इतक्या मोठ्या आपत्तीशी सरकार एकटं नाही लढू शकणार. आपण आपआपला वाटा उचलायला हवा, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.

नाम फाउंडेशनच्या माध्यमातून, पीएम आणि सीएम फंडासाठी प्रत्येकी 50 लाख पाठवणार आहोत. तुम्हीही तुमचा वाटा उचलाल याची खात्री आहे. कृपया घराबाहेर पडू नका, असं आवाहनही नाना पाटेकर यांनी केलं आहे.

दरम्यान, घराबाहेर न पडणं ही सगळ्यात मोठी देशसेवा आहे या क्षणाला. एवढी मेहरबानी करा, असं नाना पाटेकर म्हणाले.

 

ट्रेंडिंग बातम्या-

प्रवरा मेडिकल ट्रस्ट 6 दिवसात उभारणार ‘कोविड 19’चे नवीन हॉस्पिटल; मदतीचं आवाहन

रामायणाला ऑप्शन आला रे… पाहा या चॅनेलवर भारत पाकिस्तान वर्ल्डकपचे ऐतिहासिक सामने

महत्वाच्या बातम्या-

‘कोरोना’नंतरचा काळ आर्थिक संकटाचा, काटकसरीने वागा- शरद पवार

कोरोनाचा सामना करण्यासाठी रामदेव बाबांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

भाजप कार्यकर्त्यांनो, गरीब माणूस उपाशी झोपणार नाही याची काळजी घ्या- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More