अकोला | देशात कोरोनाच्या रूग्णांचं प्रमाण दिवसागणिक वाढतंय. त्यातच अकोल्यातील जिल्हा कारागृहाच्या 50 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. शिवाय इतर 28 लोकांनाही कोरोनाची लागण झालीये. अकोल्यात आज दिवसभरात 78 कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत.
यापूर्वी अगोदर 18 कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. जिल्हा कारागृहातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहात सध्याच्या घडीला 300 कैदी आहेत. कोरोनाच्या काळात कोणत्याही नव्या कैद्याला कारागृहात आणण्यात आलेलं नाही.
सरकारी मेडीकल कॉलेज आणि रूग्णालयातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, रविवारी सकाळी 78 लोकांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ज्यामध्ये 50 जिल्हा कारागृहातील कैद्यांचा समावेश आहे. अकोले जिल्ह्यात कोरोना रूग्णांचा आकडा 1498 पर्यंत पोहोचला असून आतापर्यंत 76 लोकांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. राज्यात आज 5493 रुग्णांची वाढ झालीये. तर 2330 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.59 टक्के एवढे झालंय.
ट्रेंडिंग बातम्या-
शरद पवारांच्या त्या टीकेला बाळासाहेब थोरातांचं उत्तर, म्हणाले…
इंधन दरवाढीविरोधात 29 जूनला काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन!
महत्वाच्या बातम्या-
शुभमंगल साssवधान!, लग्नासाठी बोलावलेल्या पाहुण्यांपैकी 15 जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह
राज्यात आज 5493 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?
…तर कोरोनाची ही लढाई कदापि जिंकता येणार नाही- देवेंद्र फडणवीस
Comments are closed.