महाराष्ट्र मुंबई

राज ठाकरेंच्या उपस्थितीत 500 आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न

पालघर | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीत आज 500 आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे हा विवाह सोहळा पार पडला.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंचा मुलगा अमित आणि मिताली बोरुडे यांचा विवाह सोहळा पार पडला होता. त्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे विवाहसोहळ्यात पाहायला मिळाले.

पालघर जिल्ह्यातील गरीब, शेतकरी, मजूर आणि आदिवासी समाजातील 500 जोडप्यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.

दरम्यान, बोईसर येथील खैरपाडा मैदानात हा विवाहसोहळा पार पडला.

महत्वाच्या बातम्या-

सत्ता कशी मिळवावी हे प्रकाश आंबेडकरांनी माझ्याकडून शिकावं-रामदास आठवले

आसाममध्ये मोदींना दाखवले काळे झेंडे; मोदी गाे बॅकच्या दिल्या घोषणा

राष्ट्रवादीने ठरवलंय, कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाणांना पाडायचं!

मनसे पदाधिकाऱ्याला 6 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक

नरेंद्र मोदींच्या डोक्यावर ‘राफेल’चं भूत, ‘हिंदू’च्या बातमीने भाजपचे कंबरडे मोडले!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या