बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तलावात 500च्या नोटा तरंगताना दिसल्या, नंतर झालं असं काही की…

जयपूर | पैसा म्हटलं की भले-भले लालची होतात. अशातच राजस्थान येथील अजमेर जिल्ह्यात आनासनगरमधील एका तलावात 500 रुपयांच्या नोटा तरंगताना आढळून आल्या. मात्र यानंतर जे झालं त्याने हसावं की रडावं हाच मोठा प्रश्न निर्माण होत आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच गोंधळ आहे.

ही घटना रविवारी आनासनगरच्या रामप्रसाद घाटावर घडली आहे. येथील तलावात कोणीतरी पैश्यांनी भरलेली बॅग फेकली होती. यानंतर गावभर पैश्यांचा पाऊस पडला असून तलावात नोटा तरंगत असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. ही गोष्ट समजताच गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली.

अनेक गावकऱ्यांनी थेट तलावात उडी मारुन पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. लोकांना नोटा लुटताना बघितल्यावर तलावाच्या सुरक्षा रक्षकांनी देखील तलावात उडी मारली. एवढंच काय तर महापालिकेच्या कर्मचार्‍यांनीही बोट घेऊन नोटा लुटण्यास सुरुवात केली. या संपुर्ण प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली.

दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी काठीचा धाक दाखवून सर्वांना तेथून पळवून लावलं. यादरम्यान, अनेकांना 200च्या तर काहींना 500च्या नोटा हाती लागल्या. मात्र ही बॅग तलावात कोणी फेकली याचा अद्याप शोध लागला नसून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे.

थोडक्यात बातम्या-

इंग्लंडच्या युवा खेळाडूची वादळी खेळी; केवळ 65 चेंडूत केल्या 136 धावा

हनीमूनला जाताच पत्नीसमोर आलं पतीचं सत्य, त्यानंतर पत्नीनं केलं असं काही की,…

राज्यातील शाळा सुरू होणार?; शिक्षण विभागाने दिली महत्वाची माहिती

राम मंदिर भूखंड घोटाळ्याचा सरसंघचालकांनी खुलासा करावा- संजय राऊत

फोटो शेअर करत एकनाथ खडसेंनी राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More