बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कामगार मंत्री हसन मुश्रीफांच्या घरावर काढणार 50 हजार कामगारांचा मोर्चा

सोलापूर | कामगार संघटनेकडून राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना दिवाळीला भेट न दिल्यास घरावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. सेंटर ऑफ युनियन ट्रेड युनियन्स या कामगार संघटनेने  बांधकाम कामगार नोंदणीसाठी जाचक अटी काढून टाकण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.

कामगारांना 10 हजार रूपयांची दिवाळी भेट देण्यात यावी, अन्यथा 29 ऑक्टोबर रोजी हसन मुश्रीफ यांच्या घरावर 50 हजार कामगारांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सेंटर ऑफ युनियन ट्रेड युनियन्स कामगार संघटनेचे राज्य महासचिव अॅड. एम. एच शेख यांनी दिला आहेे. सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत, अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आली आहे.

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात 11 हजार कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे कामगारांना दिवाळी भेट देण्याची मागणी कामगार संघटनेने केली आहे. सेंटर ऑफ युनियन ट्रेड युनियन्स कामगार संघटनेकडून सोमवारी मागणी हक्क दिवस पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सोलापूरात बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर 18 ऑक्टोबरला सोमवारी आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, कामगार शिष्टमंडळाकडून नोंदणी अधिकारी एस.पठाण यांना निवेदन देण्यात आलं आहे. बांधकाम कामगारांची नोंदणी लवकर करण्यात यावी किंवा ऑनलाईन अर्ज स्वीकारावे, अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे. कामगारांची अनेक प्रलंबित प्रकरणे तात्काळ पुर्ण करावीत, कोरोनाकाळातील थकीत अनुदान द्यावे, अशा मागण्याही कामगार संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.

थोडक्यात बातम्या- 

ग्राहकांची प्रतिक्षा संपली! टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त SUV आली बाजारात

कोरोना लस टोचायला आलात तर खबरदार, अंगावर साप सोडण्याची दिली धमकी

कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान

T-20 विश्वचषकापुर्वीची ‘ती’ एक चूक अन् पाकिस्तानला मागावी लागली बीसीसीआयची माफी

कोरोना लस न घेण्याचा निर्णय आला ‘या’ अभिनेत्रीच्या अंगलट, वाचा सविस्तर

 

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More