LIC ची जबरदस्त योजना; ‘इतके’ रुपये गुंतवल्यास मिळतील 54 लाख

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | आयुष्यात पैसे कमवायला लागल्यानंतर सगळ्यात आधी गुंतवणुकीचा सल्ला दिला जातो. अचानक आपल्यावर एखादं संकट आल्यास ही गुंतवणूक (investment) आपल्या उपयोगाची पडते. अचानक घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाची जबाबदारी झेलणं अवघड असतं.

अशावेळी LIC पाॅलिसी करण्याचा सल्ला दिला जातो. एलआयसी पाॅलिसीमध्ये अनेक योजना आणि कमी व्याजदर उपलब्ध आहेत. एलआयसी पाॅलिसीच्या योजना सुरक्षा(Security) आणि गुंतवणूक दोन्ही प्रदान करत असतात.

अशीच एक एलआयसी कंपनीची एक योजना आहे. या योजनेत तुमचा प्रचंड फायदा होऊ शकतो. एलआयसीची ही योजना एक नाॅनलिक्विड (Nonliquid) पाॅलिसी आहे. ही शेअर बाजारवर अवलंबून नाही. त्यामुुळे ही योजना सुरक्षित मानली जाते.

या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही वयाच्या 25 वर्षी या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला या योजनेच्या मॅच्युरिटीनंतर (Maturity) 54 लाख रुपयाचा फायदा होऊ शकतो. मात्र त्यासाठी तुम्हाला वयाच्या 25 व्या वर्षी गुंतवणूक करणं गरजेचं आहे.

यासाठी तुम्हाला 20 लाखाचा विमा निवडणं गरजेचं आहे. तसेच तुम्हाला दरवर्षी 92,400 रुपये प्रमियम(premium) म्हणून भरावे लागतील. म्हणजेच यासाठी तुम्हाला महिन्याला 7,700 रुपये जमा करावे लागतील. अर्थात दिवसाला तुम्हाला फक्त 254 रुपयांची सेव्हिंग करावी लागणार आहे. यानंतर जेव्हा तुमची ही पाॅलिसी मॅच्युअर होईल तेव्हा तुम्हाला त्यावर 54 लाख मिळू शकतात.

यासाठी तुमचं कमीतकमी वय 18 वर्ष तर जास्तीजास्त वय 59 वर्ष असण गरजेचं आहे. तसेच पाॅलिसी दरम्यान पाॅलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास वारसदाराला (nominee) त्यांचा फायदा मिळू शकतो. विमा कंपनी वारसदाराला बोनससह काही निश्चित लाभ देखील देत असते.

महत्त्वाच्या बातम्या