बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ रेल्वे स्थानकावर 55 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, प्रशासनाची झोप उडाली

रांची | झारखंडमधील हटिया रेल्वे स्थानकावर धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी हटिया रेल्वे स्थानकावरुन एकाच वेळी 55 प्रवाशांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पॉझिटिव्ह आढळून आलेले सर्व प्रवासी तपस्विनी एक्स्प्रेस आणि राऊरकेला एक्स्प्रेसनं हटिया रेल्वे स्थानकावर उतरले होते. या सर्वांची रेल्वे स्थानकावर रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आली होती. 55 प्रवाशांची रॅपिड अँटिजन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

सर्व प्रवासी अँटिजन चाचणीसाठी आपला नमुना देऊन आपापल्या घरी निघून गेले होते. कोणताही व्यक्ती जर पॉझिटिव्ह आढळून आला तर त्याला आयसोलेशन सेंटर किंवा कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात यावं, असं आरोग्य विभागानं बजावून सांगितलं आहे.

दरम्यान, देशात सध्या सणासुदीचं वातावरण आहे. नवरात्रीनंतर आता दिवाळी आणि छठ पुजेची जोरदार तयारी सुरू आहे. यातच कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णसंख्येतील वाढीमुळे रेल्वे स्थानकांवरही चाचण्याची संख्या वाढविण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या- 

…तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा- संजय राऊत

भाजपचा आणखी एक नेता म्हणतो, ‘माझ्यामागे ईडी लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार’

“भविष्यात राजेश टोपेंची जागा आर्थर रोड तुरुंगात असेल”

“शाहरुख खानने भाजपत प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील”

“देशात केवळ 23 कोटी लसी दिल्या गेल्या, पुराव्यानिशी सिद्ध करू”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More