बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेल्या 55 जणांना कोरोनाची लागण

मुंबई | दिग्दर्शक करण जोहर याच्या 50 व्या वाढदिवसाची पार्टी एक सुपर-स्प्रेडर इव्हेंट ठरली आहे. कारण जवळपास 55 स्टार कलाकार पाहुण्यांना कोविड-19 ची लागण झाली आहे. करण जोहर याच्या पार्टीत कोरोनाचा स्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

या पार्टीत अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी सहभागी झाले होते. त्यानंतर 1 जून रोजी कार्तिक आर्यन आणि कतरिना कैफ यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान या पार्टीतील अनेक सेलिब्रेटिना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा आहे.

इंडस्ट्रीतील करणच्या अनेक जवळच्या मित्रांना पार्टीनंतर कोविडची लागण झाली आहे. त्यांनी कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं जाहीर केलं नसलं तरी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, कियारा आडवाणी आणि कार्तिक आर्यन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘भूल भुलैय्या 2’ अलिकडेच प्रदर्शित झाला. त्याआधी कार्तिक आणि कियारानं चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं होतं. कार्तिक आर्यननं नुकतीच करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती.

थोडक्यात बातम्या- 

“महाविकास आघाडीचा प्रयोग बाळासाहेबांना देखील आवडला असता”

“आम्ही टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच, शेंबड्या पोराला समजवतात तसं पडळकरांना समजवा”

Monsoon Update: पुढील पाच दिवसात राज्यातील ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज

“उद्धव ठाकरेंच्या सभेची गर्दी विरोधकांना मोजत बसावी लागेल”

“कोरोनाच्या काळातही भारत थांबला नाही, देशाने आपल्या सुधारणांचा वेग वाढवला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More