बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लूडो गेम खेळण्याच्या बहाण्याने 55 वर्षीय नराधमाने 2 अल्पवयीन मुलींसोबत केलं ‘हे’ दुष्कृत्य

नागपूर | नागपूरमधून एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेम खेळण्याच्या बहाण्याने शहरातील दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. नागपूरमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण आधीच वाढलं असताना त्यात अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून 55 वर्षीय आरोपी डोलचंद चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार शेजारी राहणाऱ्या 10 ते 12 वर्षांच्या मुलींवर लूडो गेम खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलवून दोन्ही मुलींच्या तोंडाला कपडा बांधून त्यांच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

55 वर्षीय आरोपी डोलचंद चव्हाणने मुलींना गेम खेळण्याच्या नावाखाली घरी बोलावून अत्याचार केला आणि त्यानंतर मुलींनी घडलेला प्रकार आपल्या घरी सांगितल्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तक्रारदाराच्या शेजारी राहणाऱ्या 55 वर्षीय डोलचंद चव्हाण या नराधमाला अटक केली आहे.

देशात महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कायदा कडक करूनही काही नराधमांना कायद्याची कोणत्याही प्रकारची भीती नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी सरकार नेमकी काय पावलं उचलणार? असा प्रश्न जनमानसातून विचारला जात आहे.

थोडक्यात बातम्या

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; चांदिवाल समितीला दिवाणी अधिकार

‘या’ जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या साडेसात हजारांवरून थेट 3 हजारांवर

‘प्राण कंठाशी आलेल्या लोकांना वाली कोण?’; सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर कडाडून टीका

दिलासादायक! मुंबईतील कोरोनाबाधितांंच्या संख्येत घट; कोरोनामुक्तीचा दर 91 टक्यांवर

ऑक्सिजनसाठी अशोक चव्हाणांकडे 15 लाखांची मागणी; चव्हाणांचा थेट नितीन गडकरींना फोन

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More