Top News

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस पदकांची घोषणा, महाराष्ट्रातील 58 पोलिसांना पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली | महाराष्ट्रातील एकूण 58 पोलिसांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहेत. 5 पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक, तर 14 पोलिसांना शौर्य पदक आणि प्रशंसनीय सेवेकरता 39 पोलीस पदक जाहीर झाली आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी 15 ऑगस्टला देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करतं. यावर्षी एकूण 926 पोलीस पदक जाहीर झाली आहेत.

80 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक’ तर 215 पोलिसांना पोलीस शौर्य पदक’ आणि 631 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 58 पदक मिळाली आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या खात्यातील 15 कोटी कुठं गेले?; एक ‘मोठा’ व्यवहार माहीत झाला आहे!

अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना योग्य ते प्रत्युत्तर दिलं जाईल- रामनाथ कोविंद

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा योगायोग, की… या गोष्टीची एकच चर्चा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल कोरोनाबाधित

…तर नाईलाजाने डॉक्टरांवर मेस्मा लावाला लागेल, हसन मुश्रीफ यांचा इशारा

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या