6 महिन्यात कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर निर्णय होणार!

कुलभूषण जाधव

नवी दिल्ली | कुलभूषण जाधव यांच्या फाशीसंदर्भात पाकिस्तान  6 महिन्याच्या आत निर्णय घेण्याची शक्यता आहे. टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिलंय.  पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दूल बासित यांनी काही दिवसांपूर्वीच याप्रकरणी सुतोवाच केलं होतं.

कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्यानूसार नव्हे तर पाक कायद्यानूसारच कुलभूषण जाधव यांच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असं अब्दुल बासित यांनी म्हटलं होतं. दरम्यान, तथाकथित हेरगिरीच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव सध्या पाकिस्तानच्या कैदेत आहेत. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या